कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी विद्युत शहवावाहिनी गरजेची !

balu dhanorkar
balu dhanorkar

नागपूर : कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. दररोज दोन आणि कधी कधी त्यापेक्षाही जास्त लोक मृत्यूमुखी पडत आहेत. कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतील व्यवस्था अपुरी पडते आहे. यंत्रणेला अडचणी येत आहेत. त्यामुळे शहरात विद्युत आणि एलपीजी शवदाहिनी लावावी, अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांना केली आहे.

कोरोना विषाणुचे लोण शहरात व ग्रामीण भागात पसरले आहे. चंद्रपुर शहरात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. मृत्यूचीही संख्या वाढत असल्याने मृतांच्या अंत्यसंस्काराकरीता असलेल्या स्मशानभुमीत व्यवस्था अपुरी पडते आहे. अशा परीस्थितीत बरेचदा अंत्यविधी पार पाडायला अडचण होते, विलंब होतो.

कोरोना बाधितांच्या वाढत्या मृत्यूमुळे अंत्यविधी करताना घ्यावी लागणारी विशेष काळजी व उपाययोजना याचा नातेवाइकांसह प्रशासनाला देखील त्रास होतो आहे. या आपात्कालीन परीस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाला बरेचदा अडचणी येतात. अंत्यसंस्काराला विलंब होत असल्याने मृतदेहाची विटंबना होत असल्याच्या तक्रारी येत असतात. त्यामुळे शहरात विदयुत आणि एलपीजी शवदाहिनी लावण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. यामध्ये उपचार घेत असताना कोरोना बाधितांचे मृत्यूदेखील होत आहेत. महानगर पालिका प्रशासनातर्फे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यामुळे विदयुत, एलपीजी शवदाहिनी शहरात लावल्यामुळे अंत्यविधी करताना निर्माण होणारे अनेक प्रश्न सुटणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या शवदाहिनी लावण्यात आल्या आहेत. चंद्रपुर वाढत्या लोकसंख्येचे शहर असल्याने याचा फायदा कोरोना आपात्कालीन काळात आणि ईतर वेळीही होणार आहे. मरणोपरांत देहाची विटंबना होवू नये, नातेवाईक व प्रशासनाला त्रास होवू नये, असे खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com