शॉक लागून इव्हेंट मॅनेजरचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 October 2019

नागपूर : मनपाच्या थेट वीजमीटरमधून वीजचोरी करीत "दिवाळी पहाटवारा' कार्यक्रमासाठी डीजेची व्यवस्था करणाऱ्या एका युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी पहाटे आठ वाजता रेशीमबागमधील संत तुकाराम उद्यानातील कार्यक्रमात घडली. पंकज दिगांबर सातपुते (वय 35, रा. त्रिमूर्तीनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी सक्‍करदरा पोलिसांनी कला संगम कला सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कला संगम कला सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रेशीमबागेतील संत तुकाराम उद्यानमध्ये "दिवाळी पहाटवारा' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी पोलिस विभागाची, महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभागाची तसेच मनपा विभागाची कोणतीही रीतसर परवानगी घेतली नव्हती. या कार्यक्रमाचे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम पंकज सातपुते यांना देण्यात आले होते. आज सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास पंकज हे डीजेची वायरिंग करीत होते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डीजे लावणे तसेच कार्यक्रमासाठी वीज उपलब्ध करण्यासाठी महानगरपालिकेच्या मीटरचे कुलूप तोडून त्यातून वीजचोरी केली. डीजेची वायर जोडणी करीत असताना पंकज यांना जबर धक्‍का बसला. त्यामुळे ते फेकल्या जाऊन बेशुद्ध पडले. त्यांना लगेच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्या तक्रारीवरून सक्‍करदरा पोलिसांनी कला संगम कला सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर पंकज यांच्या मृत्यूस जबाबदार धरून गुन्हा दाखल केला. पदाधिकाऱ्यांनी वीजचोरी केली तसेच पोलिस आणि मनपाची परवानगी घेतली नाही, त्यामुळे कारवाई करण्यात आली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electric shock, event manager died