
तेल्हारा : स्लॅबचे काम आटोपल्यानंतर मिक्सर मशीनला ढकलून बाजूला करीत असताना लिफ्टचा स्पर्श सर्व्हिस वायरला झाल्याने १३ बांधकाम कामगारांना विद्युत शॉक लागला. यापैकी १२ बांधकाम कामगार फेकल्या गेले तर, एका १७ वर्षीय कामगाराचा करुण अंत झाल्याची घटना तालुक्यातील वडगांव रोठे येथे दि. १२ ऑगस्ट रोजी सांयकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मृतक कामगार हा संग्रामपूर तालुक्यातील वसाडी येथील रहिवाशी आहे.