esakal | बापरे... झोपडीचे विजेचे बिल चक्क साडेपासष्ट हजार 
sakal

बोलून बातमी शोधा

The electricity bill of the hut is about six and a half thousand

चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा ) येथील  विधवा वनिता उत्तम शिवरकर या झोपडीवजा मोडक्या दोन खोल्यांच्या घरात राहतात. काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचे कसेबसे पालन पोषण करतात.

बापरे... झोपडीचे विजेचे बिल चक्क साडेपासष्ट हजार 

sakal_logo
By
जितेंद्र सहारे

चिमूर (जि. चंद्रपूर) :  कोरोना महामारीने सर्वत्र आर्थिक दमछाक चालू असताना महावितरणच्या गोंधळामुळे सर्वसामान्य  मेटाकुटीस आले आहेत. चिमुर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा) येथील अठरा विश्वेदारिद्रय असलेला वनिता उत्तम शिवरकर या विधवा महिलेच्या झोपडीचे वीज बिल चक्क ६५ हजार ५२० आले आहे. या अवास्तव बिलाने वनिता यांना शॉक बसला असून आता काय करावे असा प्रश्न पडला आहे. 


अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला
 

चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा ) येथील  विधवा वनिता उत्तम शिवरकर या झोपडीवजा मोडक्या दोन खोल्यांच्या घरात राहतात. काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचे कसेबसे पालन पोषण करतात. मात्र, वीज वितरण विभागाच्या गोंधळाने तिला चक्क  ६५ हजार ५२० रुपयांचे बिल आले. एवढे मोठे वीज बिल कसे भरायचे, हा  प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे काम नाही व त्यामुळे पैसा नाही. अशा परीस्थितीत आलेल्या अवाढव्य बिलाने या गरीब विधवेची चिंता वाढवली आहे. 
       
आलेले अवास्तव बिल कमी करण्याबाबत वनिताच्या मुलाने महावितरण कार्यालयाचे खेटेही घातले. वनिताचे घर अवघे दोन खोल्यांचे. त्यांच्या घरात दोन किंवा तीन लाईट आणि एक छोटा टीव्ही. अशा घरात साधारण महिन्याचे लाईट बिल साधारण ५०० ते ८00 रुपयांपर्यंत येणं अपेक्षित आहे. त्यांनी महावितरणकडे नव्या मीटरची मागणी केली आहे.  

संपादन  : अतुल मांगे