
Rain Damages Crops
sakal
नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यात मुसळधार पावसाने लोंबा टाकलेल्या हलक्या व फुलोरा आलेल्या भारी धानपिकाचे फार मोठे नुकसान झाले असतानाच २२ सप्टेंबरला गोठणगाव वनक्षेत्रात पावसानंतर आता हत्तीचे आगमन झाले आहे. त्यामुळे हत्तीच्या धुमाकूळात आता उरलेले पीकही जाणार? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र, वनविभाग हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहे.