चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव प्रवासी वाहन उलटले, मग...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

शंकरपूर येथील टाटासुमो चालक प्रवासी घेऊन कानपाला निघाला होते. खैरी जवळ वाहन चालक राजीक शेख यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

चिमूर (जि. चंद्रपूर) : चिमूर-शंकरपूर-कांपा मार्गावरील खैरी जवळ एमएच 19 ऐई 7301 क्रमांकाचा टाटासुमो चालक गुरुवारी सकाळी 10 वाजता अवैध प्रवासी घेऊन जात होता. अचानक चालकाचे नियंत्रण वाहनावरून सुटल्याने झालेल्या अपघातात 11 प्रवासी जखमी झाले. यातील चार प्रवासी गंभीर असल्याची माहिती आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरपूर येथील टाटासुमो चालक प्रवासी घेऊन कानपाला निघाला होते. खैरी जवळ वाहन चालक राजीक शेख यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला. यात वाहन चालक राजीक शेख 22, कविता गोपीचंद मेश्राम 46, गोपीचंद नथू मेश्राम 50, सुमण शालीक डहाके 64, शालीक डहाके 70, प्रभाकर दाघो बारेकर 60, सर्व राहणार शंकरपूर, तर आंबोली येथील कांशीराम गोविंदा ठाकरे 40 व कांता कांशीराम ठाकरे 34, चांदी येथील आडकू तिकडू मारबते 65, जवळी येथील लक्ष्मण ननावरे 65, कवडशी येथील दिनकर पांडुरंग देशमाने हे जखमी झाले. जखमींना शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर जखमींना चिमूर, चंद्रपूर व नागपूरला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. 

असे का घडले? - कोणी सांगेल का? माझी काय चूक होती...

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अवैध वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांना केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven passengers injured in the accident at chandrapur