Elina Tigress Shifted to Dnyanganganga Sanctuary
esakal
बुलडाणा जिल्ह्यातील बोथा येथील ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ‘एलिना’ या मादी वाघिणीचे रविवारी (ता. २६) ज्ञानगंगा अभयारण्यात यशस्वी स्थलांतरण करण्यात आले. या प्रक्रियेसाठी आमदार संजय गायकवाड यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरल्याचे सांगितले जात आहे.