Grocery Store Theft : नोकरानेच केली दुकानात चोरी; रोख ९० हजार लंपास, गुन्हा दाखल
Store Theft : मोताळ्यातील एका किराणा मॉलमध्ये काम करणाऱ्या नोकरानेच रात्रीच्या सुमारास शटर उघडून ९० हजार रुपये चोरले. सीसीटीव्हीत चोरी कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मोताळा : येथील एका किराणा मॉलमध्ये काम करणाऱ्या नोकरानेच दुकान फोडून गल्ल्यातील ९० हजार रुपये लंपास केल्याची घटना गुरुवारी (ता. २६) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध शुक्रवारी (ता. २७) गुन्हा दाखल केला आहे.