बचतगटामुळे मिळाला एक लाख महिलांना रोजगार

file photo
file photo

वर्धा : स्वयंसहायता गटातील महिलांना शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) स्वयंसहायता गट प्रत्येक गावात कार्यरत आहे. त्यांना बॅंकांनी कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे त्यातून विविध हातमाग व्यवसाय सुरू केले. त्यातून जिल्ह्यातील सुमारे एक लाख महिलांना रोजगार मिळाला आहे.
जिल्ह्यात आज 12 हजार 595 बचतगट कार्यरत असून त्यात एक लाख 40 हजार सदस्य आहेत. जिल्ह्यातील वर्धा, देवळी व सेलू या तालुक्‍यांतील 95 टक्के गावांमध्ये महिला बचतगटांची स्थापना केली असून उर्वरित तालुक्‍यांमध्ये अंदाजे 75 ते 76 टक्के गट कार्यरत आहेत. एकही गाव बचतगटापासून वंचित राहणार नाही, यासाठी चमू काम करीत आहे. तसेच बचतगट स्थापन करण्यात आलेल्या सर्व गावांमध्ये बॅंक लिंकेज केले आहे. 2018-19 मध्ये एकूण 5 हजार 474 महिला स्वयंसहायता गटांना विविध उद्योग, हातमाग व्यवसाय उभारणीकरिता 67 कोटी 31 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. स्वयंसहायता गट बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करतात. बचतगटांना कर्ज देण्यासाठी सर्वांत आघाडीवर बॅंक ऑफ इंडिया, त्यानंतर भारतीय स्टेट बॅंकेचा नंबर लागतो.
एनपीएचे प्रमाण शून्य टक्के असल्याने विविध कोट्यवधी रुपयांचे कर्ज मागील आर्थिक वर्षात दिले आहे. तसेच 2019-20 या वर्षासाठी बॅंकांनी 93 कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. महिला सक्षमीकरणासाठी स्वयंसहायता गट हे एक प्रभावी माध्यम आहे. वर्धा जिल्ह्यात गटांची उत्कृष्ट पायाभरणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत करण्यात आली आहे. तसेच सदर बचतगटांना निरनिराळे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन शाश्वत उपजीविकेचे साधन निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. जिल्हास्तरावर जिल्हा व्यवस्थापक तर तालुकास्तरावर तालुका व्यवस्थापक कार्याचे नियोजन करतात. जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांना बॅंकेचे अर्थसाहाय्य मिळण्याकरिता उमेदद्वारे नियुक्त 109 बॅंक सखी व 110 आर्थिक साक्षरता सखी प्रत्येक बॅंकेच्या शाखेत कार्यरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com