कामठी : नवीन कामठी पोलिस ठाणे हद्दीतील जबलपूर महामार्गावरील नेरी शिवारातील कन्हान पुलावर स्वतःची मोटारसायकल कडेला उभी करून युवकाने उडी मारल्याची घटना बुधवारी (ता.३०)दुपारी एकच्या सुमारास घडली..राहूल रामदासजी मते (वय३२, विरसी, तालुका मौदा) असे मृत तरुणाचे नाव आहे. नवीन कामठी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाहणी करून एसडीआरएफ चमुला बोलावून शोधकार्य सुरु केले आहे..मात्र आत्महत्तेमागील कारण समजू शकले नाही. त्या दिशेने पोलिस तपास करीत आहे. नदीपात्रात वाहत्या पाण्यामुळे शोधकार्यात अडथळा होत आहे.जोपर्यंत शव पाण्याच्या वर तरंगत नाही तोपर्यंत शव मिळू शकणार नाही. घटनेच्या काही दिवसांपूर्वी देखील याच पुलावरून आपल्या पतीसोबत कारमध्ये आलेल्या महिलेने उडी घेऊन आत्महत्या केली होती, हे उल्लेखनीय..राहुल हा वर्धमाननगर नागपूरला मॅकेनिकलचे काम करत असून नागपूरला काकाकडे राहात होता. मंगळवारी रात्री विरसी गावात घरच्यांना भेटण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली दुपारी तो नागपूरला जाण्यास निघाला. मात्र तो मध्येच नेरी गावाजवळील कन्हान नदीच्या पुलावर दुचाकी (एमएच ३१/ सीटी १८१६) उभी करून नदीत उडी घेताना कुणीतरी पाहिले. याची सूचना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी एसडीआर एफच्या मदतीने शोध मोहीम राबविली. परंतु सायंकाळपर्यंत पत्ता लागू शकला नाही. राहुलची दुचाकी त्याच्या परिवाराकडे सोपविण्यात आली आहे..Chess: गरजू बुद्धिबळपटूंचा 'मसिहा'! नागपूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर अनुपने समाजापुढे ठेवला आदर्श; दिव्यालाही केलेलं मार्गदर्शन.सलग तीन आत्महत्यायाच कन्हान नदीवरील पुलावरून काही दिवसापूर्वी एका विवाहित महिलेने पतीसमोरच उडी घेतली होती. नंतर मात्र मृत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी मृताच्या पतीच्या विरोधात तक्रार देऊन तिच्या पतीनेच नदीत ढकलून जीव घेतला असल्याचा आरोप केला होता. त्या घटनेंनंतरची हि दुसरी घटना आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.