Biogas : वर्ष उलटले तरी बायोगॅसधारकांना केंद्राच्या अनुदानाची प्रतीक्षाच

केंद्राकडून निधी मिळाला नसल्याने मागील आणि चालू वर्षातील राज्यातील ३३ जिल्ह्यातील बायोगॅस लाभार्थी अर्थसहाय्यापासून वंचित आहेत.
biogas
biogassakal
Updated on

संग्रामपूर, जि. बुलडाणा - केंद्राकडून निधी मिळाला नसल्याने मागील आणि चालू वर्षातील राज्यातील ३३ जिल्ह्यातील बायोगॅस लाभार्थी अर्थसहाय्यापासून वंचित आहेत. तालुका स्तरावर उद्दीष्टय पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना मोठी कसरत करून लाभार्थी शोधावे लागतात. त्यातच शासन अनुदानासाठी विलंब करीत असल्याने भविष्यात अशा योजना राबवणे जिकरीचे होणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती स्तरावरून निवडलेल्या लाभार्थ्यांनी जवळचा पैसा खर्च करून बायोगॅसची निर्मिती केली. यामध्ये मागील वर्षी राज्याने आपल्या हिश्श्याचे १० हजार रुपये अनुदान दिले. परंतु केंद्राकडून उर्वरित हिस्सा म्हणजेच १४ हजार रुपये अद्याप मिळालेला नाही.

लाभार्थ्यांना दररोज पंचायत समितीमध्ये चकरा मारण्याची वेळ आली आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. शासन स्तरावर नवीन राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षीं योजना राबविण्यात येते.

याच योजनेतून २०२२-२३ व २०२३-२०२४ वर्षासाठी राज्यातील ३३ जिल्ह्यात तालुकानिहाय उरिष्टानुसार बायोगॅसचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. यामध्ये राज्य शासनाचा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शेषफंडातून मिळणारा वाटा वितरित करण्यात आला. त्यानंतर दुसरा हप्ता केंद्र पुरस्कृत असल्याने वर्ष होऊनही अद्याप निधी नसल्याने लाभार्थी अडचणीत आले आहेत.

१९८२-८३ पासून बायोगॅस संयंत्रशक्ती सरकारी योजना ग्राम पातळीवर राबविण्यात येत आहे. लाभार्थी मिळवण्यासाठी खेडयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. बांधकामासाठी लाभार्थ्यांना सर्व खर्च जवळून करावा लागत असल्याने मोलमजुरी करणाऱ्यांसाठी ही योजना अनुदानाच्या विलंबामुळे समस्येची ठरते आहे.

साहित्याच्या वाढत्या किंमती आणि मजुरी पाहता मिळणारे अनुदान तुटपुंजे ठरत असले तरी या योजनेचा सकारात्मक दृष्टीकोन पाहता बांधकाम पूर्ण केले. योजनेचा उद्देश ग्रामीण भागात बायोगॅस संयंत्राच्या उभारणीतून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत पुरविणे, वृक्ष तोडीस आळा बसावा आणि बायोगॅसच्या माध्यमातून वीज निर्मिती व्हावी, हे या योजनेचे उद्देश आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Government promotes biogas blending in CNG and PNG
India Post Staff Car Driver Recruitment: Class 10 Pass Govt Job For Central Employees
Citizens received certificates, financial assistance, agricultural subsidies and information about various Maharashtra government welfare schemes.
solapur mahapalika
Marathi News Esakal
www.esakal.com