esakal | नवनीत राणांनी घेतला उखाणा अन् उपस्थितांच्या तोंडी एकच वाक्य 'वाह वाह क्या बात है!'
sakal

बोलून बातमी शोधा

Everyone praise Navneet Rana foe her Ukhana in Amaravati

नवनीत राणा यांचा उखाणा ऐकून सर्वांच्याच तोंडून वाह वाह क्या बात है हेच वाक्य होतं.  

नवनीत राणांनी घेतला उखाणा अन् उपस्थितांच्या तोंडी एकच वाक्य 'वाह वाह क्या बात है!'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमरावती: खासदार नवनीत राणा हे नाव आपल्या सर्वांनाच नवीन नाही. आपल्या खास रोखठोक शैलीमुळे  त्या नेहमीच चर्चेत असतात. राजकारण किंवा समाजकारण विषय कुठलाही असो नवनीत राणा यांची प्रतिक्रिया महत्वाची असते. पण हे आम्ही तुम्हाला का सांगत आहोत? त्याचं कारणही तसंच आहे. यावेळी नवनीत राणा यांचा उखाणा ऐकून सर्वांच्याच तोंडून वाह वाह क्या बात है हेच वाक्य होतं.  

अधिक वाचा -  पानिपतावर जिंकण्यासाठी नव्हे तर तत्वासाठी लढले मराठे; पहिल्यांदाच उघड झालीत धारातीर्थी पडलेल्या सरदारांची नावं 

त्याच झालं असं की दरवर्षी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं पतंग महोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. या पतंग महोत्सवात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हेदेखील पतंग बाजी करतात. त्यामुळं या महोत्सवात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होतात. यादरम्यान खासदार नवनीत राणा यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र यानंतर तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापुढे उखाणा घेण्याचा आग्रह धरला. मग काय नवनीत राणांनी घेतला हटके उखाणा. 

'शंकराच्या पिंडीवर संत्र्यांची फोड,.....

'शंकराच्या पिंडीवर संत्र्यांची फोड, रवींचं बोलणं साखरेपेक्षा गोड' असा उखाणा नवनीत राणांनी घेतला आणि उपस्थित महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

पतंगावर स्लोगन लिहून सरकारकडे मागणी 

यावर्षी पतंग महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत द्यावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी पतंगावर स्लोगन लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली.

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top