
बाभूळगाव (जि. यवतमाळ) : तालुक्यातील पाचखेड येथे सुरू असलेल्या उत्खननामध्ये महापाषाण लोहयुगीन काळातील घराचे पुरावे सापडले आहे. यात लोखंडी अवजारे, चुली याशिवाय सातवाहन काळातील सहा विहिरी आढळल्या आहेत. यामुळे या भागात प्राचीन मानवी वस्ती असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.