‘त्या’ लेकीकडून शेतकऱ्यांना लागली अपेक्षा

collector
collector

बुलडाणा : राजमाता जिजाऊंचा जिल्हा म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्याला पहिल्यांदाच एक महिला जिल्हाधिकारी म्हणून डॉ. निरुपमा डांगे यांना संधी मिळाली. लंडन येथे त्या अभ्यासासाठी जात आहे. रिक्त झालेल्या जागेवर सलग दुसऱ्यांदाही जिल्हाधिकारी म्हणून एक महिलाच असल्यामुळे पुन्हा एकदा इतिहास घडला आहे. सुमन चंद्रा या 2010 आयएएस बॅचच्या महाराष्ट्र कॅडेरच्या अधिकारी असून, त्या 11 डिसेंबरला श्री दत्त जयंतीच्या दिवशी पदभार स्वीकारणार आहे.

दिल्ली येथील महाराष्ट्र सदर येथे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या सुमन चंद्रा यांची जिल्हाधिकारी म्हणून मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात पहिलीच पोस्टिंग आहे. याअगोदर त्यांनी महाराष्ट्रात काम केले आहे. त्यांच्यामते धडपड हा प्रत्येक गोष्टीचा अविभाज्य भाग आहे. आयएएस असताना विविध जबाबदारी पार पाडणे आणि सूक्ष्म पातळीवर उपायांची अंमलबजावणी करणे असे मत त्या सोशल मीडियावर व्यक्त करतात. सुमन चंद्रा यांनी महाराष्ट्रात उल्लेखनीय कामगिरी आतापर्यंत केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आदीवासींसाठी उपाययोजना
दिल्ली येथे जाण्यापूर्वी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात महत्त्वपूर्ण काम केले आहे. येथील दुर्गम भागातील आदीवासींसाठी विविध उपाययोजना त्यांनी राबविल्या आहेत. त्यावेळी त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाइव्हलिहुड मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महिला सक्षमीकरण आणि दारिद्र्य निर्मूलनाची जबाबदारी आयएएमवर सोपविली गेली. 

२.५० लाख बजत गटांचे जाळे विणले
महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 2.50 लाख बचत गटांच्या माध्यमातून जाळे विणण्याचा उपक्रम हाती घेत या मिशनमध्ये सर्वांना सोबत घेऊन दररोज वाढती बेरोजगारी आणि गरिबीची परिस्थिती कशी निर्मुलन करण्याच्या अजेंड्यावर त्यांनी प्रभावीपणे कामे केले. आयएएस झाल्यानंतर महाराष्ट्र कॅडेरच्या सुमन चंद्रा यांना एसडीएम आणि प्रकल्प अधिकारी म्हणून पहिली पोस्टिंग नंदुरबार मधील आयटीडीपीमुळे आदिवासींच्या जीवनशैली जवळ आणि वैयक्तिकरित्या पाहण्याची संधी मिळाली. 

उस्मानाबाद जिल्ह्यात जनजीवन उंचविण्यासाठी प्रयत्न
त्यांची पोस्टिंग मराठवाड्यातील उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून झाली. सतत दुष्काळात मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा अशी ओळख होती. ग्रामीण भागातील जनजीवन उंचविण्यासोबत पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली. महिला सीईओ असताना अनेक समस्यांना समोरे जावे लागले परंतु, त्यावर मात करत त्यांनी पाठीमागे वळून न बघता सातत्याने कार्य करण्यात लक्ष दिले. 

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
या सर्व गोष्टींमुळे जिल्ह्यात ज्या गोष्टी हव्या आहेत त्या दिशेने कार्य करण्यास अडथळा आला नाही. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील त्यांचे उल्लेखनीय काम पाहता पाणी संवर्धनामुळे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्याची संधी मिळाली. किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीच्या स्वच्छता मॉड्यूलच्या क्षेत्रात जिल्ह्यात हे काम केले जात आहे. 

दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये कौतुकास्पद कार्य
देशातील एमएचएमसाठी धोरण तयार करण्यासाठी भारत सरकारने हाती घेतले होते. त्यांनी दिल्लीत महाराष्ट्र सदन येथेही विशेष व्यवस्थापन आणि विविध उपक्रम हाती घेत कौतुकास्पद कार्य केले आहे. बुधवार (ता.11) त्या बुलडाण्यात दाखल होऊन जिल्हाधिकारी पदाचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्याकडून घेणार आहे. 

धाडसी आणि धोरणात्मक निर्णयाकडे नजर
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न, कर्ज प्रकरण, वाळू माफिया, महसूल विभागातील अडचणी, विविध प्रकल्पाचे रखडलेले पुनर्वसन, भू-संपादन मोबदला, कर्मचारी वर्गाची कमतरता आणि इतर मूलभूत प्रश्‍न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. सुमन चंद्रा यांची पहिलीच पोस्टिंग असल्यामुळे त्यांच्या धाडसी आणि धोरणात्मक निर्णयाकडे सर्वांची नजर लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com