धानावर दुप्पट खर्च करूनही निघायची नाही मुद्दल, यंदा बदलले पीक अन् साधली किमया 

दीपक फूलबांधे
Thursday, 15 October 2020

धान उत्पादनासाठी रोवणीच्या कामापासून कापणी व मळणीपर्यंत एकरी 15 ते 18 हजार रुपये खर्च होतो. मात्र, त्यातुलनेत फारसे उत्पादन मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. येथील शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे.

तुमसर (जि. भंडारा) : तालुक्‍यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी दरवर्षी होणाऱ्या तोट्याला कंटाळून शेतात कपाशी लावण्याचा नवा प्रयोग केला आहे. यातून त्याला एकरी 50 ते 60 हजार रुपये नफा मिळणे अपेक्षित आहे. भंडारा जिल्हा धान उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहे. तुमसर परिसरात 90 टक्‍के शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. परंतु, सध्या निसर्ग तसेच वाढती महागाई यामुळे शेतात धानाच उत्पादन घेणे त्यांना परवडत नाही.

धान उत्पादनासाठी रोवणीच्या कामापासून कापणी व मळणीपर्यंत एकरी 15 ते 18 हजार रुपये खर्च होतो. मात्र, त्यातुलनेत फारसे उत्पादन मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. येथील शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे.

कपाशीला एक हजार रुपये खर्च असून एकरी 13 ते 14 क्विंटल उत्पादन होते. यात त्यांना जवळपास एकरी 50 ते 60 हजार रुपये नफा अपेक्षित आहे. कपाशी उत्पादनाच्या दृष्टीने येथून रामटेक व मौदा परिसर जवळ असल्यामुळे वाहतूक करून तिथे माल विकण्यासाठी त्रास होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

ठळक बातमी -  मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल
 

यामुळे बाजारपेठा उपलब्ध आहे. परंतु, शेतकऱ्यांची मानसिकता नाही. त्यामुळे ते दरवर्षी कर्जबाजारी होत आहेत. आता काही शेतकऱ्यांनी कंटाळून शेती करणे सोडले आहे. परंतु, शेतकऱ्यांनी उमेद सोडू नये तर, पारंपरिक शेतीला फाटा देऊन दुसऱ्या उत्पादनाकडे वळणे आवश्‍यक आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न तामसवाडी येथील अरविंद बारबैले यांनी केला आहे.
श्री. बारबैले हे वयोवृद्ध शेतकरी तामसवाडी येथील रहिवासी असून त्यांच्याकडे वडिलोपार्जित साडेतीन एकर शेती आहे.

त्यांनी पारंपरिक पीक घेणे सोडून आता आधुनिक शेतीकडे वळले आहे. एकेकाळी त्यांच्या शेतात पूर्णपणे धानाचे पीक घेतले जात होते. परंतु, खर्च दुप्पट असून नफा कमी आहे. अनेक वर्षे या शेतकऱ्याने आपली शेती ठेक्‍याने दिली होती. परंतु कालांतराने त्यांनी अभ्यास करून कपाशी पेरण्याचा नवीन प्रयोगावर अंमलबजावणी केली आहे.

त्यांनी दृढ निश्‍चय करून कपाशीचा संकल्प केला. पहिल्या वर्षी दीड एकरामध्ये 50 ते 60 हजार रुपये नफा कमावला.  आता अरविंद बारबैले परिसरातील इतर शेतकऱ्यांना कपाशी लावण्याचे  मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे या भागात 10 ते 15 शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची लागवड केली आहे. 

कपाशी लावून नवा प्रयोग
तुमसर तालुक्‍यात धान, भाजीपाला व उसाची लागवड केली जाते. या पिकातून शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा नफा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बदलली नाही. अरविंद बारबैले यांनी कपाशी लावून नवा प्रयोग केला. यातून इतर शेतकऱ्यांसमोर एक चांगले उदाहरण निर्माण केले आहे. एकरी 50 ते 60 हजार रुपये नफा मिळत असेल तर, शेतकऱ्यांना कपाशी लागवड करण्याचा हरकत नाही. शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा नवीन प्रयोग करून आपल्या उत्पन्नात वाढ करावी. 
-सुनील पारधी 
संचालक, नवदुर्गा कृषीकेंद्र तुमसर

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: experiment of cotton cultivation at Tamaswadi in Bhandara district

टॉपिकस
Topic Tags: