esakal | ब्रेकिंग : गोंदियातील सोयगावटोली जंगलातून विस्फोटके जप्त; नक्षलवाद्यांचा घातपात आणला उधळून

बोलून बातमी शोधा

Explosives seized from Soyagatoli forest in Gondia}

माहितीवरून पोलिस अधीक्षक पानसरे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सी-६० देवरीचे कमांडो, सशस्त्र दुरक्षेत्र भरनोलीचे पथक व बीडीडीएस पथक व केशोरी पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबविले.

ब्रेकिंग : गोंदियातील सोयगावटोली जंगलातून विस्फोटके जप्त; नक्षलवाद्यांचा घातपात आणला उधळून
sakal_logo
By
मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : केशोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सोयगावटोली जंगलात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले विस्फोटके पोलिसांनी जप्त केले आहेत. ही कारवाई बुधवारी (ता. ३) करण्यात आली.

सोयगावटोली येथील जंगलात पोलिसांना ठार मारण्याच्या व घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी विस्फोटके पेरून ठेवली आहेत. अशी गुप्त माहिती पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांना मिळाली. या माहितीवरून पोलिस अधीक्षक पानसरे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सी-६० देवरीचे कमांडो, सशस्त्र दुरक्षेत्र भरनोलीचे पथक व बीडीडीएस पथक व केशोरी पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबविले.

अधिक माहितीसाठी - ...तर अमरावतीत यापुढे लॉकडाउन नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत

यावेळी एका डब्ब्यात स्फोटके साहित्य लपवून ठेवल्याचे आढळले. बीडीडीएस पथकाने हे साहित्य निकामी केले. यात नऊ वंत डिटोनेटर, तीन जिलेटीन कांड्या व रसायनमिश्रित वाळू आदी साहित्य होते. याप्रकरणी केशोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल करीत आहे.