esakal | ...तर अमरावतीत यापुढे लॉकडाउन नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत

बोलून बातमी शोधा

no lockdown in amravati if people follow corona rules says collector shailesh naval }

जिल्हाधिकारी म्हणाले,  कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाकडून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्याचे सकारात्मक परिणामसुद्धा दिसायला लागले आहेत. नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जागृती निर्माण झालेली दिसून येते.

...तर अमरावतीत यापुढे लॉकडाउन नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत
sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : अमरावती शहर तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाउन जाहीर करण्यात आला. नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास भविष्यात लॉकडाउनची गरज राहणार नाही, असे स्पष्ट संकेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.

हेही वाचा - "आई तुझा प्रॉब्लेम काय आहे?" असं विचारत...

जिल्हाधिकारी म्हणाले,  कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाकडून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्याचे सकारात्मक परिणामसुद्धा दिसायला लागले आहेत. नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जागृती निर्माण झालेली दिसून येते. अनेकजण आता शिस्तीमध्ये आले आहेत. त्यामुळे अशीच वर्तणूक राहिली तर यापुढे लॉकडाउन वाढविण्याची गरजच राहणार नाही. विशेष म्हणजे आठ मार्चपर्यंत प्रशासनाकडून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. एकाच झटक्‍यात लॉकडाउन न उघडता टप्प्याटप्याने ते उघडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - यवतमाळच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून लॉबिंग सुरू? पुसदचा बंगला केंद्रस्थानी;...

अमरावती जिल्ह्याची परिस्थिती अतिशय गंभीर होत असल्याने प्रशासनाकडून अमरावतीसह अचलपूर व अंजनगावसर्जी या शहरामध्ये लॉकडाउन जाहीर केला आहे. काही व्यापाऱ्यांनी लॉकडाउनबाबत नाराजीसुद्धा व्यक्त केली आहे. मात्र, जिल्हा प्रशासन लॉकडाउनच्या निर्णयावर ठाम आहे. सध्याच्या संचारबंदीला नागरिक सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 8 मार्चनंतर लॉकडाउन पूर्णपणे न उघडता टप्प्याटप्याने मोकळीक देण्यात येईल, असे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे आता आठ मार्चनंतर  पुन्हा लॉकडाउन राहणार नाही, हे मात्र स्पष्ट झाले आहे.