पतीचे जुळले एका शिक्षिकेशी सुत...पत्नीकडे केली दहा लाखांची मागणी

quarreling
quarreling

सकाळ वृत्तसेवा
अमरावती : नोकरी करणाऱ्या पत्नीला राजीनामा देऊन सोबत राहा, अन्यथा दहा लाख रुपये दे, अशी मागणी केली. ती पूर्ण न केल्यामुळे बळजबरीने तिचा गर्भपात करून घेतला. त्यानंतर दुसरीसोबत त्याने संसार थाटला.
अंजनगावसुर्जी पोलिसांनी याप्रकरणी पीडित विवाहितेच्या पतीसह तिचा छळ करणारी पतीची प्रेयसी आणि इतर दोघे, अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नोकरीत असलेल्या महिलेचा लग्नानंतर तिच्या पतीसह सासरच्यांनी काही दिवसांनी शारीरिक, मानसिक छळ करणे सुरू केले. याच कालावधीत पतीचे एका शिक्षिकेसोबत सूत जुळल्याने पतीने पत्नीकडे घटस्फोट घेण्यासह नोकरी सोडण्याकरिता दबाव टाकला. अन्यथा दहा लाख रुपयांची पत्नीकडेच मागणी केली. परंतु पतीचे लग्नापूर्वीपासूनच एका शिक्षिकेसोबत सूत जुळल्याची माहिती पत्नीला मिळाली. तिने आयुक्तालयाच्या हद्दीत जाऊन शहानिशा केली असता, पती आणि शिक्षिका पती-पत्नीसारखे राहत असल्याचे तिच्या लक्षात आले. याच कालावधीत पत्नी गर्भवती झाली. मात्र पतीने तिला खासगी औषध देऊन तिचा गर्भपात करून घेतला, असा आरोप पीडित पत्नीने अंजनगावसुर्जी ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com