Groom father kidnapping: रिसोड तालुक्यात बनावट वधूच्या माध्यमातून लग्न फसवणूक, वरपित्याचे अपहरण आणि सिने स्टाइल मारहाणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीस कारवाईत बनावट वधूसह चार आरोपी अटकेत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
रिसोड : ग्रामीण भागात लग्नासाठी मुली मिळत नसल्याने कोणतीही शहानिशा न करता मध्यस्थामार्फत लावलेल्या लग्नात मुलाची फसवणूक झाल्याचा प्रकार रिसोड तालुक्यात उघडकीस आला आहे.