

Fake Degree Racket
esakal
चंद्रपूर: नामांकित विद्यापीठांच्या बनावट पदवी व गुणपत्रिका तयार करून लाखो रुपयांना विकणाऱ्या रॅकेटचा तपास वेगाने सुरू आहे. दुर्गापूर पोलिसांनी आरोपी अक्षय खोब्रागडे याच्या नागपुरातील मानकापूर येथील घरावर छापा टाकून लॅपटॉप, कलर प्रिंटरसह बनावट कागदपत्रे तयार करण्याचे साहित्य जप्त केले. दरम्यान, कथित मास्टरमाइंड परिमल गौरकर याचे आणखी एक वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.