
चंद्रपूर : आयटीआय प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल २११ विद्यार्थ्यांना बनावट गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. याप्रकरणात नागभीड येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड नर्सिंग सेंटरच्या संस्थापकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या विद्यार्थ्यांची ५६ लाख ७१ हजार रुपयांनी फसवणूक झाली आहे.