
दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्यात यंदाच्या २०२५-२६ खरीप हंगामासाठी सुमारे ३४ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. तालुक्यात पाऊस चांगला असून, सुरुवातीला सोयाबीन पिकाची परिस्थिती चांगली होती. परंतु, गत आठवड्यात सोयाबीन पिकांवर अचानक हुमणी आळीने आक्रमक केले. यामुळे हजारो एकरावरील सोयबीन पीक धोक्यात आले.