esakal | मुलीने केले पळून लग्न अन्‌ कुटुंबाने घेतली विहिरीत उडी
sakal

बोलून बातमी शोधा

Well

गडचिरोली शहरातून सेमानाकडे जाणाऱ्या बायपास मार्गावरील आनंदनगर परिसरात असलेल्या एका शेतातील विहिरीत या तिघांचेही मृतदेह सोमवारी आढळून आले. रवींद्र वरगंटीवार यांची मुलगी शनिवारी (ता. 8) प्रियकरासोबत पळून गेली होती.

मुलीने केले पळून लग्न अन्‌ कुटुंबाने घेतली विहिरीत उडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : आई-वडील व मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शहरात सोमवारी (ता. 10) उघडकीस आली. रवींद्र नागोराव वरगंटीवार (वय 50), वैशाली नागोराव वरगंटीवार (वय 43) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार (वय 19, सर्व रा. विवेकानंदनगर) अशी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. 

अवश्‍य वाचा- हिंगणघाटच्या "त्या' दुर्दैवी घटनेतील मृत अंकितावर अंत्यसंस्कार 

प्रियकरासोबत पळून केला विवाह

गडचिरोली शहरातून सेमानाकडे जाणाऱ्या बायपास मार्गावरील आनंदनगर परिसरात असलेल्या एका शेतातील विहिरीत या तिघांचेही मृतदेह सोमवारी आढळून आले. रवींद्र वरगंटीवार यांची मुलगी शनिवारी (ता. 8) प्रियकरासोबत पळून गेली होती. तिने दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. 9) वेगळ्या समाजाच्या असलेल्या प्रियकराशी चामोर्शी तालुक्‍यातील मार्कंडादेव येथे विवाह केला. या घटनेमुळे मुलीचे वडील रवींद्र वरगंटीवार यांच्यासह त्यांची पत्नी व मुलाच्या मनावर मोठा परिणाम झाला. ते सर्व नैराश्‍यग्रस्त झाले. त्यामुळे तिघांनीही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. घटनेचा तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत. 
 

loading image
go to top