पातूरचा प्रसिद्ध सिदाजी महाराजांचा यात्रा महोत्सव रद्द

sidaji maharaj.jpg
sidaji maharaj.jpg

पातूर (जि. अकोला) : पातुरात दरवर्षी सिदाजी महाराज यात्रा महोत्सव भरविण्यात येते. पंचक्रोशीतून भाविकांची या महोत्सवाला मोठ्याप्रमाणात गर्दी जमते. मात्र, यावर्षी ‘कोरोना’च्या पृष्ठभूमीवर यात्रा महोत्सव रद्द करण्यात आली आहे. तर तालुक्यातील तीन लग्न समारंभही पुढे ढकलण्यात आली असून, उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांना नगर परिषदेने नोटीसही बजावल्या आहेत.

लग्न समारंभही रद्द
दरवर्षी पातूरच्या मध्यवस्थीमध्ये पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिदाजी महाराज यांचा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. तालुक्यातील विविध गावातील सुमारे 10 हजार भाविक महोत्सवाला हजेरी लावतात. मात्र, सध्या ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्याने संस्थानच्यावतीने स्वयंस्फूर्तीने हा महोत्सव बंद ठेवण्यात आल्याची माहिती यात्रा पंच मंडळाचे अध्यक्ष महादेश गणेशे यांनी दिली. गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत असे दहा दिवस हा कार्यक्रम चालत असतो. नगर परिषदेच्यावतीने दर शनिवारी भरणारा आठवडी बाजारही बंद करण्याचे आदेश दिले आहेत. न.प. सभागृहांमध्ये होणारे 3 लग्न समारंभ रद्द केल्या करण्यात आले आहेत. नागरिकांना वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा असे आवाहन मुख्‍याधिकारी सोनाली यादव यांनी केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील खापरखेड येथे आयोजित गळित धान्य प्रशिक्षण कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आल्याने तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे यांनी कळविले आहे.

बाहेरगावावरून येणाऱ्या व्यक्तीवर लक्ष
प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गावांगावात सर्वेक्षण चालू आहे. बाहेरगावावरून येणाऱ्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांची प्राथमिक तपासणी करून शंका आल्यास त्याला सर्वोपचार रुग्णालयात पाठविले जात आहे.
-डॉ. आर. पी. पाटील, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पातूर

नागरिकांनी शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे
सामाजिक, धार्मिक, क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रमांवर 31 मार्चपर्यंत प्रतिबंध घालण्यात आले आहे. पातूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांनी एका ठिकाणी गर्दी करू नये. एकंदरतीच नागरिकांनी शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे.
-गजानन गुल्हाने, ठाणेदार, पातूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com