लॉकाडाउनचा धसका! मिरचीतोड मजुरांनी धरला गावचा रस्ता, तेलंगणामध्ये गेले होते कामाला

farm labor return to home from telangana due to chances of lockdown
farm labor return to home from telangana due to chances of lockdown

पोंभुर्णा (जि. अमरावती) : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन केले जाईल, अशीच चर्चा सर्वत्र आहे. त्यामुळे तेलंगणा राज्यात मिरची तोडणीसाठी गेलेल्या मजुरांना लॉकडाउनची भीती सतावत आहे. त्यामुळे अनेक मजुरांनी लॉकडाउनच्या भीतीने गावचा रस्ता धरला आहे.

तेलंगणा राज्यातील अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. पोंभुर्णा तालुक्‍यासह विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील मजूर शेतीची कामे संपल्यावर तेलंगणात मिरची तोडणीच्या कामासाठी जात असतात. यावर्षीसुद्धा हजारो मजूर तेलंगणा येथे मिरची तोडणीच्या कामासाठी गेले आहेत. मात्र, राज्यात पुन्हा लॉकडाउन लागल्यास मोठा त्रास सहन करावा लागेल, या भीतीने अनेक मजुरांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे.

मिरची तोडणीचा हंगाम सुमारे तीन महिन्यांचा असतो. या कालावधीत मजूर काम करून वर्षभराचे नियोजन करीत असतात. त्यासाठी जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांतील मजूर या कामासाठी तेलंगणा राज्यात जात असतात. मात्र, मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा कोरोनाचे संकट आहे. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने लॉकडाउन होईल, अशी भीती अनेकांत व्यक्त होत आहे. त्यामुळे पोंभुर्णा तालुक्‍यातील अनेक मजुरांनी आपलाच गाव बरा म्हणत वाट धरली आहे.

मागीलवर्षीचा धसका -
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मागीलवर्षी मार्च महिन्यात देशात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे अनेक मजूर तेलंगणा राज्यात अडकून पडले होते. लहान मुलांना घेऊन शेतात, झाडाखाली, बसस्थानकात आश्रय घेत दिवस काढावे लागले होते. मजुरांना या काळात मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. अनेकांनी शेकडो किलोमीटर पायदळ गाव गाठले. तर, काही मजुरांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने गावागावांत पोहोचविण्यात आले. यावर्षीसुद्धा लॉकडाउन झाल्यास मोठा त्रास सहन करावा लागेल, अशी भीती मजुरांत आहे. मागीलवर्षीचा धसका घेऊन मजुरांनी गावाचा रस्ता धरला आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com