उमरीबाजार येथील शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

गजानन ताकोते यांच्याकडे दोन एकर शेती होती. त्यांनी यंदा कपाशीची पेरणी केली; पण वेळेवर निसर्गाने पाठ फिरविल्यामुळे दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर आले. त्यांना तीन मुली असून एका मुलीचा विवाह मागील वर्षीच झाला. त्यामुळे थोडेफार कर्ज त्यांच्यावर होते.

वनोजाबाग (अमरावती) : उमरीबाजार येथे एका शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. पावसाने ऐन वेळेवर दगा दिल्याने पेरणी वाया गेली. त्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यामुळे ते चिंताग्रस्त होते.

गजानन हरिभाऊ ताकोते, असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे दोन एकर शेती होती. त्यांनी यंदा कपाशीची पेरणी केली; पण वेळेवर निसर्गाने पाठ फिरविल्यामुळे दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर आले. त्यांना तीन मुली असून एका मुलीचा विवाह मागील वर्षीच झाला. त्यामुळे थोडेफार कर्ज त्यांच्यावर होते. अजून दोन मुलींचा विवाह होणे बाकी आहे.

विदर्भाच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

दुबार पेरणीचे संकट आल्याने ते चिंतित झाले होते. यातच त्यांनी घरात आत्महत्या केली. उमरी येथील पोलिस पाटलांनी तक्रार दिल्यानंतर रहिमापूरचे ठाणेदार शेख जमील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A farmer committed suicide in Amravati district