
नांदुरा : तालुक्यातील भोटा येथील प्रगतिशील शेतकरी श्याम पाटील यांनी स्वतःच्या मोटरसायकलवर एक वेगळ्या प्रकारचा ढाचा तयार करून जुगाड टेक्नॉलॉजीचा अवलंब केला आहे. त्यातून ते दिवसाला १५ एकरच्या आसपास डवरणी तर यंत्राद्वारे २० एकर पर्यंत करत फवारणी करत आहेत.