प्रेमाचं अनोखं उदाहरण! शेतकऱ्याने पार पाडले मृत बैलाचे दशक्रिया विधी; लोकांना दिले तेराव्याचे जेवण    

Farmer did all Dashkriya widhi of his bull after him
Farmer did all Dashkriya widhi of his bull after him

यवतमाळ : शेती ,शेतकरी आणि वृषभ राजा आपल्या कृषी व्यवस्थेचा, अर्थव्यवस्थेचा, दाण्यापाण्याचा, सगळ्या जगण्याचा कणा. शेतकरी ही अशी व्यक्ती आहे की  त्याचे आपल्या मुलाबाळांवर आपल्या कुटुंबावर प्रेम असते तेवढेच प्रेम शेतीसाठी राबणाऱ्या आपल्या वृषभ राजावर म्हणजे आपल्या बैलावर असते .

शेतकरी आणि बैल याचे अतूट  आणि भावनिक नाते असते .याचाच प्रत्यय आला यवतमाळ जिल्ह्यातील अति दुर्गम भागातील मुकुटबन गावात .कैलास राऊत यांच्याकडे गेल्या १५-१६ वर्षांपासून एक बैल होता. दरवर्षी या बळीराजाला हा बैल प्रत्येक कामात मदत करत होता. 

शेतीत नांगरणी असो की इतर कुठली कामं हा वृषभराजा करत होता.  मात्र आजारपणामुळे या बैलाचा मृत्यू झाला . या कुटुंबाला आपल्या घराचा सदस्य गेल्या सारखे दुःख झाले . 

या कुटुंबाने घराचा सदस्य गेल्यासारखे या वृषभ राजाचे दशक्रिया विधी पार पाडले. विधिवत लोकांना जेवणपण दिले , यामुळे बळीराजा आणि वृषभराजाचे किती भावनिक संबंध असतात हे सिद्ध होते 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com