...अन्‌ मुलाने जन्मदात्या बापाला कोवळ्या वयात चितेवर जळताना बघितले

सुमीत हेपट
Friday, 12 June 2020

सर्वत्र शेतीच्या कामाला वेग आला आहे. बळीराजा पेरणीसाठी सज्ज झाला आहे. पावसाची प्रतीक्षा होती. शेतकऱ्यांचे चेहरे आनंदी दिसत होते. परंतु, यात विजेच्या कहरामुळे एका शेतकऱ्याच्या पत्नीला सौभाग्याचे लेणं पुसावे लागले.

मारेगाव (जि. यवतमाळ) : मृग लागला तरी मृगसरी बरसल्या नाहीत. शेतकऱ्यांना मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. अशातच गुरुवारी (ता. दहा) चार वाजता पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांनी कलकलाट केला. तालुक्‍यात तीन ठिकाणी वीजा पडल्यामुळे पावसाच्या आनंदावरच विरजण पडले. कुठे कुणाचा जीव गेला तर कुणाला गंभीर दुखापत झाली.

तालुक्‍यात सर्वत्र शेतीच्या कामाला वेग आला आहे. बळीराजा पेरणीसाठी सज्ज झाला आहे. पावसाची प्रतीक्षा होती. तीसुद्धा गुरुवारी पूर्ण झाली. शेतकऱ्यांचे चेहरे आनंदी दिसत होते. परंतु, यात विजेच्या कहरामुळे एका शेतकऱ्याच्या पत्नीला सौभाग्याचे लेणं पुसावे लागले. तर मायबापांनी पोटचा गोळा गमविला. मुलाने जन्मदात्या बापाला कोवळ्या वयात चितेवर जळताना बघितले.

हेही वाचा : मध्यरात्री पंधरा-वीस सशस्त्र नक्षलवादी घरात घुसले आणि...

शिवणाळा येथे शेतात सकाळपाळीला काम करून घरी अंघोळ, जेवण आणि थोडी विश्रांती घेऊन दुपारी शेतात काम करण्यास जात असताना शेतकऱ्यावर वीज कोसळली. त्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. नव्यानेच मारेगाव येथे नगरपंचायत इमारत तयार करण्यात आली. वर्ष लोटून उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या इमारतीवर वीज कोसळल्याने तडे गेले आहेत. यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा प्रकारे तालुक्‍यात तीन घटना घडल्या आहेत.

पावसाच्या आनंदावरच विरजण
साखरा येथील शेतकरी विनोद किनाके (वय 35) याच्यावर वीज पडून मृत्यू झाला. शिवणाळा येथील शेतकरी लालू आत्राम (वय 60) यांच्या पाठ व कमरेवर विजेचा स्पर्श झाल्याने गंभीर जखमी झाले. मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनांमुळे पावसाच्या आनंदावरच विरजण पडले आहे.

विदर्भाच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

शेतकरी योद्धाला हिरावून घेतले
मारेगाव तालुक्‍यात साखरा येथे पावसापासून बचाव करण्यासाठी जंगलात झाडाचा सहारा घेतलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळली. त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. शिवणाळा येथे शेतकरी शेतात जात असताना वीज पडल्याने तो गंभीर जखमी झाला. मारेगाव येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या नगरपंचायतीच्या इमारतीवर वीज पडल्याने भिंतीला तडे गेले आहेत. एकाच वेळी तालुक्‍यात विजेच्या कहरात तीन घटना घडल्या आहेत. विविध प्रकारच्या संकटांचा सामना करणाऱ्या शेतकरी योद्धाला हिरावून घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer died due to lightning