

Farmer Dies Under Debt Burden as Two Lakh Loan Becomes Eleven Lakh Sparks Fresh Demand for Farm Loan Waiver in Maharashtra
sakal
वर्धा: कर्जफेडीची चिंता आणि बँकेच्या वसुलीचा तगादा यामुळे मानसिक तणावाखाली असलेले हेलोडी येथील शेतकरी वासुदेव सावरकर यांचे शुक्रवारी (ता.३०) सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. दोन लाख रुपयांच्या शेतीकर्जाचे तब्बल ११ लाख रुपये झाल्याने कर्जफेड कशी करावी, या विवंचनेत ते होते.