पिकांच्या संरक्षणासाठी शेती सभोवताल लावत होते विद्युत तार; शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

संदीप रायपुरे
Saturday, 14 November 2020

अचानक विजेच्या शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दिवाळीच्या दिवशी म्हणजे शनिवारी पहाटे उघडकीस आली. सदर मृत इसमाच्या पश्चात आई०वडील पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे गोजोली गावात शोककळा पसरली आहे.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : शेतपीक हाती येण्याच्या मार्गावर असताना वन्यजीव मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. वन्यजिवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बांधव विद्युत करंट लावतात. याच विद्युत धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना दिवाळीच्या दिवशी म्हणजे शनिवारी उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, गोंडपिपरी तालुक्यातील धाबा परिसरात धान कापणीच्या कामाला वेग आला आहे. अशा स्थितीत वन्यजीवांचा हैदोस धान पिकासाठी नुसकानदायक ठरत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील शेतकरी साईनाथ मेश्राम हे रानटी डुक्करांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात विद्युत खांबावरून शेती सभोवताल विद्युत तार पसरवित होते.

अचानक विजेच्या शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दिवाळीच्या दिवशी म्हणजे शनिवारी पहाटे उघडकीस आली. सदर मृत इसमाच्या पश्चात आई०वडील पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे गोजोली गावात शोककळा पसरली आहे. दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या प्रकाने कुटुंबीयांवर आघात झाला आहे. याप्रकरणाचा तपास धाबा पोलिस करीत आहे.

अधिक माहितीसाठी - खासदार नवनीत राणा धडकणार मातोश्रीवर; मुख्यमंत्री पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप

कुटुंबीयांवर कोसळले दुखाचे डोंगर

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा दुदैवी प्रकार घडल्याने कुटुंबीयांवर दुखांचे सावट पसरले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer dies in Chandrapur district