esakal | हिरव्या आणि काळ्या रंगाचे तांदूळ बघितले आहेत? आरोग्यासाठी आहेत अतिशय गुणकारी; प्राध्यापकाने केला नावीन्यपूर्ण प्रयोग  
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer doing farming of black and green rice

हा तांदुळ गुणकारी आणि आरोग्यासाठी हितकारक असल्याचा त्यांचा दावा आहे. या वाणाच्या तांदळाची मोठी मागणी असून याला भाव सुदधा  चांगला मिळत असल्याचे  त्यांचे म्हणणे आहे.

हिरव्या आणि काळ्या रंगाचे तांदूळ बघितले आहेत? आरोग्यासाठी आहेत अतिशय गुणकारी; प्राध्यापकाने केला नावीन्यपूर्ण प्रयोग  

sakal_logo
By
विनायक रेकलवार

मूल (जि. चंद्रपूर) : तांदळाचा मुख्य व्यवसाय असलेल्या मूल तालुक्यातील धान उत्पादक पट्टयात प्रथमच काळया व हिरव्या तांदळाची ( ब्लॅक व ग्रीन राईस ) लागवड करण्यात आली आहे. सेंद्रीय खताचा वापर करून हा नाविन्यपूर्ण प्रयोग येथील सेवानिवृत्त प्राध्यापक राजेश्वर राजूरकर यांनी केला आहे.

हा तांदुळ गुणकारी आणि आरोग्यासाठी हितकारक असल्याचा त्यांचा दावा आहे. या वाणाच्या तांदळाची मोठी मागणी असून याला भाव सुदधा  चांगला मिळत असल्याचे  त्यांचे म्हणणे आहे. इतर शेतक—यांनी सुदधा  आपल्या शेतात सेंद्रीय खताचा वापर करून या धानाची लागवड करावी असे त्यांनी आवाहन केले आहे.चंद्रपूर येथे नुकत्याच झालेल्या  कृषी प्रदर्शनी  मेळाव्यात त्यांच्या या  संशोधनपर   ब्लॅक व ग्रीन राईसने मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले होते. 

भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

धान उत्पादक पटटा असलेल्या मूल तालुक्यात  शेती हा मुख्य व्यवसाय आहे. पारंपारिक पदधतीने शेती करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु येथील कर्मवीर महाविदयालयाचे सेवानिवृत्त् प्रा.राजेश्वर राजूरकर हे मागील दोन वर्षापासून संशोधनपर शेती करण्यावर भर देत आहेत. रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रीय पदधतीने शेती करण्यावर त्यांनी जास्तीत जास्त भर दिला आहे. 

प्रा. राजुरकर यांनी दोन वर्षापासून आपल्या शेतात संशोधनपर प्रयोगाकरीता ब्लॅक (कुवूरी) भात व ग्रीन (कस्तुरी) भात या वाणाची लागवड केली आहे. हा तांदूळ आरोग्यास हितकारक आणि गुणकारी असल्याचे ते सांगतात. पोषण मुल्य भरपूर प्रमााणात असलेला ओषधी गुणधर्म युक्त या वाणाचा कालावधी 110 ते 120 दिवस असून उंची 90 ते 120 सेमी तर एकरी उत्पन्न 12 ते 15 क्विंटल असल्याचे सांगितले जात आहे.  ब्लॅक राईसची वैशिष्ठे म्हणजे नैसर्गिकरीत्या ग्लूटेनमुक्त आहे. किंचित गोड चव असलेला गडद जांभळा व काळ्या रंगाचा असून  यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहे.

चंद्रपूर येथे ८ व ९ फेब्रुवारी 2020 मध्ये पार पडलेल्या कृषी प्रदर्शनी मेळाव्यात या भाताला चांगली मागणी होती. इतर वाणाच्या तुलनेत हा भात महागडा  असूनही अनेकांनी या भाताची खरेदी केली हे विशेष. इतर तांदळापेक्षा ५ ते २० पट विविध पोषण मूल्य असणारा हा तांदूळ आहे. 

ग्रीन (कस्तुरी) भाताचे वाण छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ येथून लागवडीसाठी त्यांनी आणले. या वाणाला  हिरवा रंग हा क्लोरोफीलमुळे प्राप्त होतो. विविध अन्न प्रदर्शनीमध्ये या वाणाने विविध पुरस्कार प्राप्त केले आहे .  काळ्या तांदळा प्रमाणेच हिरवा तांदूळ हा  मानवी आरोग्यास अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रा. राजुरकर यांनी सांगितले.

वडीलांनी आईला शिवीगाळ केल्यावरून संतापलेल्या मुलाने केले भयानक कृत्य

ब्लॅक राईस (कुवूरी) भाताचे फायदे

  • अँटीऑक्सिडंटमध्ये समृध्द, असंख्य अभ्यासानूसार अँथोसायनिन सामान्य परंतू गंभिर आजार रोखण्यात मदत करते.
  • शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करते
  • लठठपणा रोखण्यात मदतगार
  • हदय व रक्तवाहिण्यांसंबंधी आजारावर प्रतिबंधात्मक,
  • मधुमेह, कर्करोग, व्हिटॅमिन ई असल्याने डोळा, त्वचा तसेच रोगप्रतिकारक आरोग्य राख्ण्यासाठी उपयुक्त,
  • अनेक आजारावर गुणकारी ब्लॅक राईस (कुवूरी) वाण आहे.
  • महागडा असला तरी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड करुन निरोगी राहावे.
     

संपादन - अथर्व महांकाळ