esakal | सकाळी शेतात गेलेले राजेंद्र सायंकाळ झाली तरी घरी परतले नाही, कुटुंबीय शेतात गेले असता...
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer killed in tiger attack in Chandrapur district

चिंतीत झालेल्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम कुटुंबीयांनी शेत गाठत शोध घेण्यास सुरुवात केली. पाच ते सहा शेजाऱ्यांच्या मदतीने कुटुंबीय राजेंद्र यांचा शोध घेत होते. परंतु, अंधार झाल्याने ते कुणालाही सापडले नाही.

सकाळी शेतात गेलेले राजेंद्र सायंकाळ झाली तरी घरी परतले नाही, कुटुंबीय शेतात गेले असता...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागभीड (जि. चंद्रपूर) : वनपरिक्षेत्र नागभीडअंतर्गत शेतकरी राजेंद्र संभाजी गणवीर (55) यांचे शेत आहे. ते तुकूम येथे राहतात. गुरुवारी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. सकाळी नऊ वाजता शेतात गेलेले राजेंद्र हे सायंकाळ झाली तरी घरी परतले नाही. त्यामुळे घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. मात्र, रात्र झाल्याने ते सापडले नाही. हताश झालेल्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी हा घटनाक्रम उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गणवीर हे गुरुवारी शेतात गेले होते. शेतात काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने काही कळायच्या आत अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या गळ्याचा घोट घेत ठार केले. यानंतर त्यांचा मृतदेह घटनास्थळावरून 150 मीटर दूर घनदाट जंगलात ओढत नेला.

अवश्य वाचा : बनावट सही करून पीकविम्याची रक्कम उडविली

सकाळी नऊ वाजता शेतात गेलेले राजेंद्र गणवीर हे सायंकाळ झाली तरी घरी परतले नाही. त्यामुळे चिंतीत झालेल्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम कुटुंबीयांनी शेत गाठत शोध घेण्यास सुरुवात केली. पाच ते सहा शेजाऱ्यांच्या मदतीने कुटुंबीय राजेंद्र यांचा शोध घेत होते. परंतु, अंधार झाल्याने ते कुणालाही सापडले नाही.

यामुळे हताश झालेले कुटुंबीय रात्री उशिरा घरी परतले. तसेच नागभीड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांसह सकाळी शेतात शोध घेण्यासाठी गेले असता राजेंद्र यांच्या चपला व वाघाच्या पायांचे ठसे दिसून आले. 150 ते 250 मीटर परिसरात शोध घेतला असता राजेंद्र गणवीर यांचा नागभीड वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 624मध्ये अर्धवट खालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. सदर शेतकऱ्याच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.

हेही बघा : यवतमाळच्या हिमांशूने बनवली सोलर सायकल

वनविभागाने लावला कॅमेरा ट्रॅप
तुकूम परिसरात वाघाने हल्ला करून ठार केल्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वाघाचा वनविभागाने शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. वनविभागाच्या वतीने सदर परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेला आहे.

कुटुंबीयांना आर्थिक मदत
पोलिस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोक्का पंचनामा करून मृतदेह उत्तरीयतपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविला. मृत राजेंद्र गणवीर यांच्या कुटुंबाला वनविभागाच्या मदतीने तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली. घटनास्थळी नागभीड वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड, वनरक्षक राहुल बुरले, वनरक्षक राहुल वगारे, पोलिस निरीक्षक सोनेकर, झेप निसर्गमित्र संस्थेचे डॉ. पवन नागरे, जि. प. सदस्य संजय गजपुरे, नगरपरिषद उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, नगरपरिषद बांधकाम सभापती सचिन आकुलवार यांची उपस्थिती होती.

loading image
go to top