esakal | तोडगा काढा : शेतकऱ्याने चक्क आमदारांचीच तहसीलदारांकडे केली तक्रार, वाचा काय आहे प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

The farmer lodged a complaint against the MLA with the tehsildar

खरीप हंगामापूर्वीच आमदार बोदकुरवार यांनी आपल्या शेतात मातीचा बंधारा बांधला होता. पाण्याचा निचरा होणारा मार्गच बंद झाल्याचे लक्षात येताच विधाते यांनी आमदारांची भेट घेऊन आपली व्यथा कथन केली होती. या बाबीकडे लक्ष न दिल्याने पुढील अनर्थ घडल्याचे स्पष्ट होत आहे.

तोडगा काढा : शेतकऱ्याने चक्क आमदारांचीच तहसीलदारांकडे केली तक्रार, वाचा काय आहे प्रकार

sakal_logo
By
सूरज पाटील

वणी (जि. यवतमाळ) : लोकशाहीत सर्वसामान्य माणूस कोणत्याही वरिष्ठांच्या तथा लोकप्रतिनिधींच्या विरोधात दाद मागू शकतो, याचाच प्रत्यय तालुक्‍यात आला आहे. शेतातील पाण्याचा निचरा होण्याचा मार्गच आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी बंद केला. त्यामुळे गणेशपूर येथे वास्तव्यास असलेल्या संदीप शंकर विधाते यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार करून कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

तालुक्‍यातील गणेशपूर शिवारात विधाते यांची वारसाहक्काने प्राप्त झालेली शेती आहे. तर त्याच्या शेतालगतच आमदार बोदकूरवार यांचे देखील शेत आहे. पूर्वीपासूनच विधाते यांच्या शेतामधील पाण्याचा निचरा बोदकूरवार यांच्या शेताजवळूनच होत होता. पाणी वाहून जाण्याचा तो एकमेव मार्गच मोठा मातीचा बंधारा टाकून बंद करण्यात आला. त्यामुळे यावर्षी पाणी साचून विधाते यांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आलेले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे त्यांचे संपूर्ण उभे पीकच पाण्यात बुडाले आहे. या अनपेक्षित संकटाने शेतकऱ्याची मानसिक स्थिती ढासळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा - औषध आहे आणि रुग्णही मात्र, रुग्ण आजाराने बेजार

खरीप हंगामापूर्वीच आमदार बोदकुरवार यांनी आपल्या शेतात मातीचा बंधारा बांधला होता. पाण्याचा निचरा होणारा मार्गच बंद झाल्याचे लक्षात येताच विधाते यांनी आमदारांची भेट घेऊन आपली व्यथा कथन केली होती. या बाबीकडे लक्ष न दिल्याने पुढील अनर्थ घडल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, याप्रकरणी तहसीलदारांनी मोका पाहणी करून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.

शेतकऱ्याचे नुकसान व्हावे, असा उद्देश नाही
लगतच असलेल्या विधाते यांच्या शेतातील पाणी माझ्या शेतात येत होते. म्हणून माझ्या शेतातील पिकांचे नुकसान होत होते. मी शेती ठेक्‍याने दिलेली आहे. या उन्हाळ्यात मी शेतात माती भरली. त्यामुळे काही भाग उंच झाला. मी बांध माझ्या शेतात घातला आहे. विधाते यांच्या शेतात टावरी यांच्या शेतातले पाणी येते. त्यांनी पांदण रस्त्याने नाली काढून शेतातले पाणी काढावे, त्यांचे किंवा शेतकऱ्यांचे नुकसान व्हावे, असा माझा उद्देश कधीच राहिलेला नाही.
- संजीवरेड्डी बोदकूरवार,
आमदार, वणी.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top