Farmers and workers participate in a protest march in Karanja demanding drought relief.
esakal
कारंजा : दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. २) कारंजा शहरात शेतकरी एल्गार समिती, वाशीम जिल्ह्याच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये आर्थिक मदत, शेतमजूर व कामगारांना प्रति कुटुंब २५ हजार रुपयांचे सहाय्य, कर्ज व वीजबिल माफी, तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या मागण्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यात आले.