Wardha : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bear

Wardha : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

वर्धा : शेतात जात असलेल्या शेतकऱ्यावर दबाब धरून असलेल्या अस्वलाने भर दुपारी हल्ला चढविला. यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालात दाखल करण्यात आले आहे. संजय मारोतराव सपकाळ (वय ४२) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

आर्वी तालुक्यातील माळेगाव (ठेका) येथील शेत शिवारात संजय सपकाळ हे दुपारी शेतात जात होते. दरम्यान महादेव मुरले यांच्या शेताजवळ दबा धरून बसलेल्या अस्वलाने संजय सपकाळ यांच्यावर अचानक हल्ला चढविला. यावेळी संजय सपकाळ यांनी आरडा ओरड करताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत अस्वलाला पळवून लावले. जखमी संजय यांना ग्रामस्थांनी सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. परंतु, जखमा गंभीर असल्यामुळे त्यांना उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गावात दहशतीचे वातावरण

या परिसरात शेतकऱ्यांवर होत असलेल्या जंगली श्वापदांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. हा परिसर जंगलव्याप्त असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या घटनेने गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. या परिसरात काही दिवसांपूर्वी एका तरुणावरही अस्वलाने असाच प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.

टॅग्स :WardhaFarmerattackbear