फेरोमोन ट्रॅप प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात लावावा - शैलेश नवल

राजेश सोळंकी
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

आर्वी (वर्धा) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कापसावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण व फेरोमोन ट्रॅप वाटप कार्यक्रम शेतकरी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी येथे गुरुवारी (ता. 2) घेण्यात आला. 

याप्रसंगी तीन हजार शेतकऱ्यांना फेरोमोन ट्रॅपचे वाटप करण्यात आले.
मागील वर्षी या गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. आता कापूस पडलेल्या ठिकाणी फेरोमोन ट्रॅप लावल्यास गुलाबी बोंड अळी नियंत्रणाच्या दृष्टीने उपयोजना करणे सोयीचे व्हावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एडवोकेट भैय्यासाहेब काळे यांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल होते. उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा तहसीलदार विजय पवार जिल्हा कृषी अधिकारी विद्यमान कर तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने आदींची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या शेतात लावल्यावर आपणहा ट्रॅप दुसऱ्या शेतकऱ्यांना लावण्यासाठी प्रवृत्त करून जनजागृती करावी तेव्हाच या बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखता येईल असे आवाहन शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन बिपिन अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात कृषी उत्पन्न बाजार समिती जगदंबा ऍग्रो प्रशांत जिनिंग प्रेसिंग राहुल कॉटन सुनील ट्रेडिंग कंपनी संतोष ऑइल प्रोडक्ट्स इंटरप्राईजेस ट्रेनिंग कंपनी सिद्धिविनायक श्रीकृष्ण टेडरस आणि अमोल खोरगडे पंकज वानखेडे किशोर दाहिया मनोज बोरकर हेमंत पिसाळ दिनेश सोळंके मोहन डेहनकर आदींनी सहकार्य केले.

Web Title: farmer shoul have install feromon in farm said shailesh naval