esakal | ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या

ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
कुही : तालुक्‍यातील नवेगाव (इसापूर)येथील संजय रोहनकर (वय 48) या युवा शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील पिकांवर फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक प्राशन ऐन पोळ्याच्या दिवशी आत्महत्या केली.
संजय रोहनकर हा अत्यल्प भूधारक शेतकरी होता. शेतीवरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असायचा. परंतु शेतात सततची नापिकी होत असल्याने खासगी सावकाराचे व बॅंकेचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच असल्याने तो नेहमी याच चिंतेत असायचा. दोन्ही मुली शालेय शिक्षण घेत असल्याने त्यांच्या शिक्षणाचा खर्चही त्याला झेपेनासा झाला होता. चिंतेने तो पुरता खचून गेला होता. अशा चिंतेतून त्रस्त होऊन अखेर त्याने विष प्राशन केले. त्याच्यावर उपचार होण्यापूर्वीच रस्त्यात त्याने प्राण सोडले. शुक्रवारी सकाळी 12 वाजता नवेगाव (इसापूर) येथे त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच्या मृत्यूने गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे अपंग पत्नी व दोन मुली एवढा आप्तपरिवार आहे.
loading image
go to top