Farmer : हलगर्जीपणाची हद्दच झाली! 4 वर्षापूर्वी नाफेडला विकलेल्या हरभऱ्याचे पैसे अजुनही मिळेना

farmer
farmeresakal

तेल्हारा : तेल्हारा खरेदी विक्री संस्थेने सन २०१९-२० मधे नाफेड अंतर्गत हरबरा खरेदी केली होती. मात्र तत्कालीन अध्यक्षांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील २८ शेतकऱ्यांचे पैसे अडकून पडले आहेत.

farmer
Water Problem : चिखलीकरांना भेडसावणारी पिवळ्या पाण्याची समस्या सुटणार; आमदार महालेंनी...

शेतकऱ्यांचे मानसिक मनोबल खचू नये म्हणून केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. मात्र, तेल्हारा खरेदी विक्री संस्थे सन २०१९-२० मधे हरबरा खरेदी करून त्याचे पैसेच शेतकऱ्यांना दिले नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

गेले चार वर्षांपासून २९५ क्विंटल हरबऱ्याचे पैसे मिळाले नाही. नोंदणी न झाल्याने हा हरबरा शेतकऱ्यांना परत द्यायचा होता; परंतु तत्कालीन अध्यक्षांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना त्‍यांच्या मालाचा मोबदला मिळू शकलेला नाही. हरबरा विक्रीचे ऑडिट झाले; परंतु त्याचा अहवाल सहायक निबंधक कार्यालयात पडून आहे. या गंभीर प्रकारावर अधिकारी मूग गिळून बसले आहेत.

farmer
Param bir Singh : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे

गेल्या महिन्यात खरेदी विक्री संस्थेची निवडणूक पार पडली. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना हरबऱ्यांचे प्रलंबित पैसे परत देऊ असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ता.१७ मे रोजी आयोजित खरेदी विक्री संघाच्या मासिक सभेत या विषयावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ज्या शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संस्था अंतर्गत नाफेडला हरबरा मोजणी करून दिला आहे, त्या शेतकऱ्यांनी ता. १७ मे रोजी दुपारी तीन वाजता खरेदी विक्री कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन खरेदी विक्री संचालक विठ्ठलराव खारोडे, शिवहरि काळे, अनंत अहेरकर, वैशाली खारोडे यांनी केले आहे.

farmer
'सीटबेल्ट अलार्म' बंद करणारे उपकरण विकणाऱ्या कंपन्यांना दणका; केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण निर्देश

या शेतकऱ्यांचे अडकले पैसे

हरभरा खरेदी करून दिला पण पैसे न मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये मनोज बळीराम नेमाडे, आबादेवी सावरमल, चंदाबाई बाजोड, मो. दानिश मो. अफजल, प्रकाश अवताडे, पंजाबराव अरुडकार, गोदावरी मल्ल, धैर्यधुंर अवताडे, संजय काकड, महादेव फोकमारे, प्रमोद राठी, मुकुंद राठी, जयवंत अवचार, अभिजित वाघ, मनचला फसाले, अनिल अवताडे, पुरुषोत्तम इंगळे, गोविंद पाडिया, कार्तीकेष मोहोड, संतोष पाथ्रीकर, राजेश बुरघाटे, आकाश राऊत, निलिमा वाघ, विठ्ठल महल्ले, निखिल दौड, नरेंद्र डागंरा, केशव वाघ, उदयसिंह चव्हाण आदींचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com