esakal | अमरावतीमध्ये घरावर काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा निषेध, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
sakal

बोलून बातमी शोधा

delhi agitation

घरावर काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा निषेध, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

अमरावती : गेल्या सहा महिन्यांपासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन (farmers agitation delhi) सुरू आहे. केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे (central government agriculture act) रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच आहे. याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार (chandurbazar amravati) येथील वळी या गावामध्ये घरांवर काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. (farmers agitation against central government to oppose agriculture act in amravati)

हेही वाचा: corona positive story : एचआरसीटी स्कोअर १८ तर ऑक्सिजन लेव्हल ८२; मग झाला पुनर्जन्म

केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषिविरोधी कायदे रद्द व्हावे यासाठी मागच्या सहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. २६ मे रोजी मोदी सरकारला ७ वर्ष पूर्ण होत आहेत. शेतकरी विरोधी कायदे करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध म्हणून २६ मे रोजी प्रत्येकाने आपल्या घरावर काळा झेंडा लावावा, असे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले होते. त्यानुसार प्रहारच्या कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी आज हे आंदोलन केले आहे. घरावर काळे झेंडे लावत मोदी सरकारविरोधा निषेध व्यक्त केला आहे. कोरोनामुळे लोक बेरोजगार झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. त्यात सरकारने हे काळे कायदे आणले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.