यवतमाळातील शेतकरी खतांसाठी वेटिंगवर, बाजारपेठेत उसळली गर्दी

fertilizer
fertilizer
Updated on

यवतमाळ : मॉन्सूनचा पहिला पाऊस पडताच शेतकऱ्यांची बियाणे व रासायनिक खते खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली आहे. या गर्दीने 'कोरोना'च्या भीतीवरही मात केली आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी हक्कांचा रॅंक पाइंट नसल्याने खतांसाठी शेतकरी वेटींगवर असून, अमरावती विभागातील इतर जिल्ह्यात 85 टक्के खत पुरवठा झाला आहे.

लॉकडाउन बराचसा मोकळा झाल्याने शेतकरी खते, बियाण्यांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले आहेत. खेड्यापाड्यापासून शेतकरी तालुका तसेच जिल्ह्याच्या बाजारपेठेत धडकल्याने दुकाने व रस्त्यावरची गर्दी वाढल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. शंभर टक्‍के पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आल्याने नवीन हंगामाचे स्वप्न शेतकऱ्यांनी रंगविण्यास सुरुवात केली आहे. मशागतीची कामे आटोपली असून, पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी बी-बियाणे व रासायनिक खते आवश्‍यक त्या प्रमाणात उपलब्ध करुन घेण्याची लगबग शेतकऱ्यांना आहे. परिणामी, यंदा बियाण्यांसोबत खतं खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

अमरावती विभागात आतापर्यंत जवळपास 85 टक्के खत पुरवठा झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. केवळ यवतमाळ जिल्ह्याचा हक्काचा रॅक पॉंईट नसल्याने यवतमाळचा पुरवठा 65 टक्केच्या जवळपास आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव, चंद्रपूर तसेच नांदेड जिल्ह्यातील मालटेकडी या ठिकाणी तीन रॅंक लवकरच लागणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खतटंचाईवर अंकुश लागण्याची शक्‍यता आहे. सध्या जिल्ह्यात शेतकरी खतांसाठी वेटींगवर असून "ऍडव्हान्स बुकींग' करावे लागत आहे. बरेच शेतकरी रासायनिक खतांचा वर्षभर पुरेल एवढा साठा करण्याच्या मानसिकतेत आहेत. सध्या शेतकऱ्यांना युरिया खताची आवश्‍यकता नाही. तरीसुद्धा युरियाला मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळत असल्याने शेतकरी युरियाची मागणी करीत आहेत. त्यामुळे युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे.

यवतमाळच्या रॅंक पॉइंटची शिफारस
जिल्ह्याचे रॅंक पॉइंट अमरावती, चंद्रपूर व नांदेड जिल्ह्यात आहे. त्यामुळे जिल्ह्यात खत येण्यास विलंब होत आहे. अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यात रेल्वेलाइन असल्याने रॅंक लवकर लागत आहेत. सध्या बुलडाणा जिल्ह्यात शंभर टक्के खत पुरवठा झाला आहे. अकोला, वाशीम जवळपास 95 तर अमरावती जिल्ह्याचा खतपुरवठा 85 टक्‍क्‍यांच्या जवळपास झाला आहे.

खतांचा तुटवडा नाही
खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा जाणवणार नाही. मुबलक प्रमाणात खत आहे. विभागात जवळपास 85 टक्के खत पुरवठा झाला आहे. यवतमाळची अडचण असली तरी तीन रॅंक लागल्या आहेत. बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात खत उपलब्ध आहे. टंचाईच्या भीतीने शेतकरी खतांची उचल करीत आहे. मात्र, खतांची टंचाई येणार नसल्याने शेतकऱ्यांनी गर्दी करु नये.
सुभाष नागरे,
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com