मन सुन्न करणारी घटना! राज्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या भावाचा अंत्यविधी सुरू असताना मृत्यू

The farmers brother died while the funeral was going on
The farmers brother died while the funeral was going on

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) : संत्रा विक्रीच्या प्रकरणात फसवणूक झाल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची अंत्ययात्रा मंगळवारी (ता. २२) रात्री दहा ते साडेदहा वाजताच्या सुमारास सुरू असतानाच त्यांच्या भावाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

अंजनगावसुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील शेतकरी अशोक पांडुरंग भुयार (वय ५५) यांनी धनेगाव येथील आपल्या शेतातील संत्र्याचा बहार अंजनगावसुर्जी येथील दोन व्यापाऱ्यांना विकला होता. मात्र भुयार यांना सदर व्यापाऱ्यांनी शेतामध्ये संत्राविक्रीचे पैसे न देता पावतीवर जबरदस्तीने स्वाक्षरी घेऊन मारहाण केली, असा आरोप आहे.

त्याबाबतची तक्रार देण्यास धनेगाव येथील पोलिस पाटील व शेतकरी अशोक भुयार हे अंजनगाव पोलिस ठाण्यात १८ डिसेंबर रोजी गेले असता त्याठिकाणी तक्रारकत्र्याला बीट जमादार व ठाणेदार यांनी मारहाण केल्याचा आरोप अशोक भुयार यांनी मृत्युपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे लिहून ठेवलेल्या चिट्ठीत केला आहे.

त्यांनी मंगळवारी (ता. २२) तालुक्यातील बोराळा गणपती मंदिराच्या परिसरातील एका शेतामध्ये विष पिऊन आत्महत्या केली. दरम्यान, मंगळवारी रात्री अंत्यविधीच्या कार्यक्रमात भडाग्नी देत असताना त्यांचा लहान भाऊ संजय पांडुरंग भुयार (वय ५४) यांच्या छातीत दुखू लागल्याने नागरिकांनी त्यांना दवाखान्यात नेले. मात्र, हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भुयार कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

अशोक भुयार यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश मन पिळवटून टाकणारा होता. मोठ्या भावाच्या मृत्यूचा धक्का बसल्याने लहान बंधू संजय भुयार यांचा स्मशानातच हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एकाच दिवशी दोन भावाचाभुयार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मृत्यू झाल्याने  आहे.

तिघांवर गुन्हे दाखल
याप्रकरणी अंजनगाव सूर्जीचे पोलिस उपनिरीक्षक दीपक जाधव संत्रा व्यापारी शेख अमीन व शेख गफूर यांनी मारहाण केल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट झाल्याने या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक जाधव गुन्हा दाखल होताच घटनास्थळ वरून पसार झाला आहे. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहे. सखोल चौकशी केली जाणार असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्याम घुगे यांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com