esakal | विषबाधा झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

विषबाधा झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजुरा (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील विहीरगाव येथील शेतकरी गोसावी गणपत सोनुले (वय 45) यांचा विषबाधा झाल्याने रविवार(ता. 1)ला सकाळी 9 वाजता राजुऱ्यातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. गोसावी हे मागील तीन दिवसांपासून शेतात कीटकनाशक औषधीची फवारणी करीत होते. विषबाधा झाल्याने कालपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांना रविवारी सकाळी राजुरा येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

loading image
go to top