अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीला सरसाला पणन महासंघ, लवकरच देणार चुकारे

चेतन देशमुख
Wednesday, 15 April 2020

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतमालाची खरेदी बंद पडली आहे. शेतामधील उभ्या शेतमालाचेदेखील प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. अशावेळी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या सूचना शासनाच्या आहेत. कापूस खरेदी सुरू केल्यास गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच पणनचे कर्मचारी धास्तावले आहेत. मात्र, शेतकऱ्यांची वाढती अडचण लक्षात घेता आता शासनाने कापूस केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

यवतमाळ : पणन महासंघाने यंदा जवळपास दोन हजार पाचशे कोटी रुपयांची कापूस खरेदी केली आहे. त्यातील दोन हजार कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. उर्वरीत पाचशे कोटींपैकी दोनशे कोटींचे चुकारे येत्या दोन दिवसांत, तर शंभर कोटींचे चुकारे त्यानंतर होणार असून, या आठवड्यात पणन तीनशे कोटी रुपयांचे चुकारे करणार आहे.

अवश्य वाचा - आठवतं का आपली पहिली भेट कुठ झाली होती?

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतमालाची खरेदी बंद पडली आहे. शेतामधील उभ्या शेतमालाचेदेखील प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. अशावेळी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या सूचना शासनाच्या आहेत. कापूस खरेदी सुरू केल्यास गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच पणनचे कर्मचारी धास्तावले आहेत. मात्र, शेतकऱ्यांची वाढती अडचण लक्षात घेता आता शासनाने कापूस केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

पणन महासंघाला त्यांच्या अडचणी व नियोजन मागितले आहे. शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, म्हणून पणन महासंघही एक पाऊल पुढे आला आहे. केंद्र सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पणन महासंघाने आतापर्यंत 80 ते 85 टक्के "एफएक्‍यू'दर्जाचा कापूस खरेदी केला आहे. उर्वरित "एफएक्‍यू' कापूस महासंघ खरेदी करण्याची शक्‍यता आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी बाजार समित्यांकडून ठराविक शेतकऱ्यांनाच बोलविण्यात येण्याची शक्‍यता आहे. असे असले तरी अद्याप कापूस खरेदी कधी सुरू होणार, हे मात्र निश्‍चित नाही.

शंभर कोटींची मार्जिंग रक्कम थकीत

पणन महासंघाला शासनाकडून मार्जिंग रक्कम दिली जाते. ही रक्कम शंभर कोटी रुपयांच्या आसपास आहे. शासनाकडून अद्याप ही रक्कम मिळाली नसल्याचे पणन महासंघाला शासनाने कळविले आहे.

पणन महासंघ शेतकऱ्यांसाठीच काम करतो आहे. शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, म्हणून आम्ही खरेदीसाठी तयार आहोत. संसर्गजन्य आजाचाराचा धोका लक्षात घेता कर्मचारी धास्तावलेले आहेत. असे असले तरी आमचे नियोजन सुरू आहे. शासन आदेशानुसार पणन काम करेल.
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, कापूस पणन महासंघ.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers to get Redemption in a week