esakal | धानविक्रीसाठी डिजिटल सात बारा हवा; शेतकऱ्यांना केंद्रावर करावी लागणार प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

farmers have to wait for digital saatbara

शेतकऱ्यांनी धानखरेदी केंद्रे सुरू होण्याआधीपासून केंद्रावर धान विक्रीसाठी आणून ठेवले आहे. तलाठ्याकडून सातबाराचा उतारा आणला आहे. परंतु, खरेदी केंद्रात डिजिटल सातबाराची मागणी होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

धानविक्रीसाठी डिजिटल सात बारा हवा; शेतकऱ्यांना केंद्रावर करावी लागणार प्रतीक्षा

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

पालोरा/करडी (जि भंडारा) : मोहाडी तालुक्‍यातील प्रत्येक आधारभूत धानखरेदी केंद्रावर 31 ऑक्‍टोबरला धानखरेदीचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. परंतु, नवीन नियमानुसार प्रत्येक केंद्रात डिजिटल सात बारा असेल तरच, धान खरेदी करा अन्यथा धानखरेदी करू नका, असे आदेश आले आहेत. त्यामुळे आधारभूत धानखरेदी केंद्रात शेतकऱ्यांना डिजिटल सातबारासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शेतकऱ्यांनी धानखरेदी केंद्रे सुरू होण्याआधीपासून केंद्रावर धान विक्रीसाठी आणून ठेवले आहे. तलाठ्याकडून सातबाराचा उतारा आणला आहे. परंतु, खरेदी केंद्रात डिजिटल सातबाराची मागणी होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तलाठी कार्यालयातून डिजिटल सातबारा मिळू शकत नाही. नेहमी प्रमाणे हाताने लिहिलेला सातबारा मिळत आहे. 

सविस्तर वाचा - विवाहितेची कमाल! जिवंत पतीला मृत दाखवून लाटले शासकीय अनुदान अन् केले दुसरे लग्न

जोपर्यंत डिजिटल सातबारा मिळणार नाही. तोपर्यंत धानखरेदी करता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर तलाठी कार्यालयात डिजिटल सात बारा तरतूद करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धानखरेदी केंद्रावर मालाची मोजणी करून विक्री करता येईल. किंवा तलाठी कार्यालयातून मिळणाऱ्या सातबारावर धानखरेदी करता येईल अशी तरतूद करण्यात यावी. जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही.

प्रशासनाने तत्काळ आधार भूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहे तसेच धान खरेदी करण्याचे आदेश देण्यात यावे, आता मोहाडी तालुक्‍यातील प्रत्येक धानखरेदी केंद्रावर डिजिटल सातबारा साठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अधिक माहितीसाठी - खासदार बाळू धानोरकरांचा इतिहास काँग्रेसमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल 

तलाठी कार्यालयात व्यवस्था करा

धानखरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांचे सातबारा ऑनलाइन होतील. अशाच शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जाईल. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी केंद्रावर धान आणून ठेवले पण, सातबारा ऑनलाइन केला नाही. अशा शेतकऱ्यांचे धान खरेदी करता येणार नाही. नियमाप्रमाणे धान खरेदी करण्यात येणार आहे. तेव्हा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयातून तत्काळ डिजिटल सातबारा देण्याची मागणी केली आहे

संपादन - अथर्व महांकाळ