esakal | 'खासदार बाळू धानोरकरांचा इतिहास काँग्रेसमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल'
sakal

बोलून बातमी शोधा

minister ashok chavan praised mp balu dhanorkar in yavatmal

तुमच्यासारख्या जोरदार व्यक्तीमत्वाची निवड योग्यच होती. त्यामुळे महाराष्ट्राचा एक क्रमांक शिल्लक राहिला, असं याठिकाणी मी अगदी प्रामाणिकपणे म्हणतो. कारण यामध्ये काही चुकीचं नाही, अगदी शतप्रतिशत खरं आहे. त्यामुळे ते मान्यच करावं लागेल, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

'खासदार बाळू धानोरकरांचा इतिहास काँग्रेसमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल'

sakal_logo
By
अतुल मेहेरे

यवतमाळ : चंद्रपूर आणि यवतमाळच्या जनतेने भाजपच्या बलाढ्य केंद्रीय मंत्र्यांना पाडून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांना निवडून दिले. त्यावेळी आमची निवड योग्य होती, असे आज समाधानाने म्हणू शकतो. बाळू धानोरकरांचा इतिहास काँग्रेसमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी खासदार बाळू धानोरकरांची प्रशंसा केली. यवतमाळ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. 

हेही वाचा - आता जबड्याची शस्त्रक्रिया होणार सोपी, डॉ. जैन यांनी लावला नवीन तंत्रज्ञानाचा शोध

खासदार धानोरकरांचं आजचं भाषण जबरदस्तच झालं, असे म्हणत मंत्री चव्हाण यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. राजकारणातील अनेक जाणकारांचे अंदाज फोल ठरवत बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर-यवतमाळ लोकसभा मतदार संघात ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी रचलेला हा इतिहास काँग्रेसमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. आम्ही तू फक्त लढ म्हण, असं म्हणायचो. ते तुमच्याकडे (बाळू धानोरकर) बघूनच. तुमच्यासारख्या जोरदार व्यक्तीमत्वाची निवड योग्यच होती. त्यामुळे महाराष्ट्राचा एक क्रमांक शिल्लक राहिला, असं याठिकाणी मी अगदी प्रामाणिकपणे म्हणतो. कारण यामध्ये काही चुकीचं नाही, अगदी शतप्रतिशत खरं आहे. त्यामुळे ते मान्यच करावं लागेल, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

हेही वाचा - चिमुकलीचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, 'माझे बाबा झिंगून घरात यावेत हे आदित्य...

मोठ्या कठीण परिस्थितीमधून आपण गेलो. चंद्रपूर आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांतील जनतेनं एकत्र येऊन केंद्रीय मंत्र्यांना पाडून याठिकाणी काँग्रेसला निवडून दिलं. हा इतिहास जेव्हा रचला गेला तेव्हापासून ते आजपर्यंत या इतिहासाचा साक्षीदार मी स्वतः आहे, ही बाब मी अभिमानाने सांगतो. याचा मला आनंदही आहे, असेही मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. यवतमाळ येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात खासदार बाळू धानोरकर यांनी धडाकेबाज भाषण केले. केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपवर त्यांनी थेट ताशेरे ओढले. त्याचीही अशोक चव्हाण यांच्यासह मंचावरील सर्व उपस्थितांनी भरभरून प्रशंसा केली.

loading image