बापरे! शेतातील मक्याच्या पिकाला पाणी देत असलेल्या शेतकऱ्यावर दडून बसलेला होता अन् अचानक...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील शेतातील मक्याच्या पिकाला पाणी देत असलेल्या शेतकऱ्यावर दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना वाडेगाव शेतशिवारात सकाळी घडली. सुरेश रामचंद्र लोखंडे असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांना उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

देगाव (जि. अकोला) : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील शेतातील मक्याच्या पिकाला पाणी देत असलेल्या शेतकऱ्यावर दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना वाडेगाव शेतशिवारात सकाळी घडली. सुरेश रामचंद्र लोखंडे असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांना उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

क्लिक करा- रात्री उशीरापर्यंत घेतले 80 संशयित नागरिकांच्या घश्‍याचे नमुने

बंदुकीचा आवाजाने वाटचले प्राण 
लोखडे हे कांदा पिकाची राखण करण्याकरिता शेतातच मुक्कामाला आहेत. मंगळवारी सकाळी शेतातील मका पिकाला पाणी देत असताना त्यांना मक्याच्या दाट पिकात हालचाल लक्षात आली. समोर बिबट असल्याचे लक्षात येताच त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

परंतु बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली. लोखंडे यांनी आरडो-ओरड केल्यामुळे यांच्या सोबत रखवाली असलेले हरीभाऊ दुतोंडे धावून आले. त्यांनी जनावराला पंगवायच्या बंदुकीचा आवाज केल्याने, बिबट्याने तेथून धूम ठोकली व लोखंडे यांचे प्राण वाचले. जखमी झालेल्या लोखंडे यांना तातडीने वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारार्थ अकोला येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाडेगाव येथे धाव घेऊन बिबट्याला शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने वाडेगाव सह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers injured in leopard attack in akola district