esakal | शेतकरीपुत्राची कमाल; एकाच वेळी लोकसेवा आयोगाच्या एवढ्या परीक्षा उत्तीर्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

farmer's son passed three examinations of the Public Service Commission at the same time

घरची स्थिती बेताचीच असल्याने अतिशय काटकसर करीत त्याने स्वत:ला झोकून देत सातत्यपूर्ण अभ्यास केला. काही काळ पुण्यात राहून तिथेही मार्गदर्शन घेतले. आधीच शासकीय नोकऱ्या कमी होत आहेत. अशात स्पर्धा परीक्षेत प्रचंड स्पर्धा असते. अशावेळी या आव्हानांवर मात करून बाजी मारणे कठीणच. पण, सुरेंद्रने जिद्द सोडली नाही.

शेतकरीपुत्राची कमाल; एकाच वेळी लोकसेवा आयोगाच्या एवढ्या परीक्षा उत्तीर्ण 

sakal_logo
By
संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : गोंडपिपरी तालुक्‍यातील तोहोगाव येथील सुरेंद्र बुटले यांच्या घरची स्थिती तशी बेताचीच. आई-वडील अल्पभूधारक शेतकरी. दिवसभर शेतात राबून संसाराच रहाटगाडग चालवायचा. अशा स्थितीत आपल्या मुलाच्या वाट्याला या वेदना येऊ नयेत यासाठी त्यांनी मुलाला अभ्यासातून स्वत:चे भविष्य घडविण्याचा सल्ला दिला. तोहोगाव येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्याने पुढील शिक्षण चंद्रपूरमधून घेतले. पारंपरिक शिक्षणाने काही घडणार नाही. याची जाणीव झाल्याने त्याने आपला मोर्चा स्पर्धा परीक्षेकडे वळविला. 

घरची स्थिती बेताचीच असल्याने अतिशय काटकसर करीत त्याने स्वत:ला झोकून देत सातत्यपूर्ण अभ्यास केला. काही काळ पुण्यात राहून तिथेही मार्गदर्शन घेतले. आधीच शासकीय नोकऱ्या कमी होत आहेत. अशात स्पर्धा परीक्षेत प्रचंड स्पर्धा असते. अशावेळी या आव्हानांवर मात करून बाजी मारणे कठीणच. पण, सुरेंद्रने जिद्द सोडली नाही. नुकतेच लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात सुरेंद्रने एकाच वेळी तीन परीक्षा उत्तीर्ण करीत सर्वांनाच सुखद धक्‍का दिला. 

हेही वाचा - "त्याला' बुडताना पाहून मित्र गेले पळून, नंतर सायंकाळी घडले असे...
 

उत्पादन शुल्क विभागात जाणार 

राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कर सहायक व लिपिक टंकलेखक या परीक्षांचा त्यात समावेश आहे. आपल्या गावातील पोराने एकाच वेळी राज्य लोकसेवा आयोगाच्या तीन परीक्षा उत्तीर्ण केल्याची माहिती कळताच गावातील मित्रपरिवारांनी जल्लोष करीत त्याचे अभिनंदन केले. सुरेंद्र या तीन पदांपैकी उत्पादन शुुल्क विभागाचे उपनिरीक्षक पद स्वीकारणार आहे. 

तरुणांना प्रोत्साहन 

तोहोगावसारख्या गोंडपिपरी तालुक्‍यातील तेलंगणा सीमेवरील गावातील एका अल्पभूधारक शेतकरीपुत्राने मिळविलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. गेल्या काही वर्षात मागास गोंडपिपरी तालुक्‍यातील मुले स्पर्धा परीक्षेत चांगलीच बाजी मारत आहेत. यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्यांना बरेच प्रोत्साहन मिळत आहे. 
 

गावात सर्वत्र चर्चा 


स्पर्धेच्या आजच्या युगात शासकीय नोकरी मिळविणे अतिशय कठीण झाले आहे. परंतु, सातत्यपूर्ण परिश्रम, चिकाटी अन्‌ सुयोग्य वाचन यशाची वाट मोकळी करून देते. गोंडपिपरी तालुक्‍यातील तोहोगाव या छोट्याशा गावातील एका अल्पभूधारक तरुणाने एकाच वेळी लोकसेवा आयोगाच्या एक दोन नव्हे तर तब्बल तीन परीक्षा उत्तीर्ण करीत वेगळ्या यशाची प्रचिती दिली. त्याच्या या कामगिरीची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असून, गावातील तरुणांना प्रेरणादायी असेच त्याचे यश आहे.

 
संपादन : अतुल मांगे 

loading image