वणी (जि. यवतमाळ) : दिवसेंदिवस शेतात उत्पन्न होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीकरिता लागणाऱ्या बैलाची किंमत वाढतच चालली आहे. त्यातच बैलांच्या चारा पाण्यावर होणारा खर्च परवडणारा नसल्याने शेतकरी बैल विकत आहेत. मात्र, चनाखा येथील शेतकऱ्याने नवीन प्रयोग करून दहा एकर शेतीची नांगरणी व पेरणी एकाच बैलाच्या साहायाने केली आहे.
मागील वर्षी सुरुवातीला पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली होती. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. त्यावरही मात करून शेतकऱ्यांनी शेतात पिके उभी केली. पीक हातात येण्याच्या वेळी परतीच्या पावसाने हजेरी लावून हातातले पीक हिरावून नेले होते. शिवाय कोरोना आजारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अवश्य वाचा : काकूच्या प्रेमात आकंठ बुडाला पुतण्या, काका ठरत होता अडसर... मग...
खरिपाची पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी दिसत आहे. शेती करण्याकरिता खरी आवश्यकता आहे ती बैलाची. मात्र, बैलजोडीच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यातच त्यांच्या पालन पोषणाचाही खर्च झेपत नसल्याने अनेक शेतकरी बैलजोडी विकून भाडेतत्त्वावर शेतीची पेरणी करीत आहेत.
या काळात दोन बैलांचे पालन पोषण करणे कठीण झाले आहे. या वर्षी काहीतरी नवीन प्रयोग करावा, अशी मनात कल्पना असली आणि मी एका बैलावर शेती करण्याचा निर्णय घेतला माझ्या शेतातली पेरणी पूर्ण झाली आहे. मी माझ्या पद्धतीने शेतीला लागणारे यंत्र तयार करून घेतले आहे. या प्रयोगामुळे माझी बचत झाली असून, शेतकऱ्यांनी एका बैलावर शेती करण्यास काही अडचण नाही.
संगीत ढवस, शेतकरी, चनाखा (जि. यवतमाळ).
|