Buldhana Accident: बुलडाणा देऊळघाट मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
Accident News: बुलडाणा देऊळघाट मार्गावर दुचाकी व पीकअप वाहनाच्या समोरासमोर धडकेत २७ वर्षीय रवी रामेश्वर गिरी जागीच ठार झाला. दोन गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्थानिक नेत्यांनी मदतकार्य केले.
बुलडाणा : समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाला समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना देऊळघाट मार्गावर शनिवारी रात्री ७:४५ वाजेच्या सुमारास घडली.